जुनी जागा विकत घेताना स्टँम्प ड्युटी माफ नाही. कृपया खोट्या मेसेजेसला बळी पडू नका. ऍड. रोहित एरंडे.
जुनी जागा विकत घेताना स्टँम्प ड्युटी माफ नाही. कृपया खोट्या मेसेजेसला बळी पडू नका. ऍड. रोहित एरंडे. पैसे वाचण्याचे किंवा मिळण्याचे मेसेजेस असतील तर त्यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो. सध्या ' व्हॉटसअप युनिव्हर्सिटी ' ह्या बाबतीत अग्रेसर आहे. एखादी गोष्ट वणव्यासारखी पसरली हा शब्दप्रयोग आता मागे पडून सोशल मिडियासारखी पसरली असे म्हणण्याची वेळ आली आहे. अश्या मेसेज ची खरी - खोटी पडताळणी न करताच "मी आधी" म्हणून असे मेसेज फॉरवर्ड केले जातात. कोरोनाच्या बाबतीत आपण हा अनुभव नक्कीच घेतला असेल. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपासून "जुन्या घरांच्या विक्री करण्यासाठी आता कोणतीही स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही" , "जुनी घरे लवकर विका, आता स्टॅम्प ड्युटी माफ झाली" अश्या आशयाच्या बातम्या किंवा अफवाच "व्हायरल" होत आहेत. फुकट ते पौष्टीक असे मानणाऱ्या गंमतीदार मानवी स्वभावाप्रमाणे अनेकांनी ह्या अफवांवर विश्वास ठेवून मनातल्या मनात स्टॅम्प ड्युटीचे पैसे वाचल्याचा आनंदही साजरा केला. अर्थात ह्या सर्व अफवाच होत्या आणि ह्या अफ...