सोसायटीमध्ये ना-वापर शुल्क (Non-Occupancy Charges) किती घेता येते ? ऍड. रोहित एरंडे.©
सोसायटीमध्ये ना-वापर शुल्क (Non-Occupancy Charges) किती घेता येते ? ऍड. रोहित एरंडे.© सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वाद हे बहुतांशी वेळा हे मेंटेनन्स, ट्रान्स्फर फी, आणि ना-वापर शुल्क अश्या आर्थिक कारणांशीच निगडित असतात. एखादा सभासद स्वतः जागा वापरात नसेल आणि तिऱ्हाईत व्यक्तीस जागा भाड्याने दिली असेल, तर त्यास ना-वापर शुल्क म्हणजेच Non Occupancy Charges द्यावे लागते. ह्याबद्दलचा कायदा येऊन दोन दशके उलटली तरी अजून ह्या बाबतीत तक्रारी येतातच. अर्थात एखाद्या सभासदाने स्वतः जागा न वापरता कुलूप लावून बंद ठेवली असेल, तर त्याकडून ना-वापर शुल्क घेता येत नाही, पण मेंटेनन्स मात्र घेता येतो. ना-वापर शुल्काची आकारणी मनमानी पद्धतीने होऊ लागली म्हणून महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये ०१/०८/२००१ अध्यादेश काढून ना-वापर शुल्क हे देखभाल खर्चाच्या (maintenance charges ) जास्तीत जास्त १० टक्केच आकारता येईल असे स्पष्ट केले . हा अध्यादेश घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा आणि सभासद...