हयातीचा दाखला - बँकेला दणका.. - ॲड. रोहित एरंडे.©
पेन्शनसाठी हयातीचा दाखला - बँकेला दणका. बँकेतर्फे घरी जाऊन दाखला घेणे कधी अनिवार्य ?. - ॲड. रोहित एरंडे.© नोव्हेंबर महिना आला कि दरवर्षी पेन्शनर लोकांना "हयातीचा दाखला - लाईफ -सर्टिफिकेट" बँकेत स्वतः जाऊन देणे अनिवार्य असते. कारण पेन्शनच्या नियमांप्रमाणे असा दाखला दिला नाही तर पेन्शन मिळणे बंद होऊ शकते. मात्र असा दाखला एखाद्या पेन्शनर व्यक्तीने दिला नाही तर बँक ऑफिसरने स्वतः संबंधित पेन्शनर व्यक्तीच्या घरी जाऊन असा दाखला का नाही दिला ह्याची खातरजमा केली पाहिजे असा महत्वपूर्ण निर्णय नुकताच कर्नाटका उच्च न्यायालयाने दिला. ह्या केसची पार्श्वभूमी थोडक्यात बघू या. (संदर्भ : एच. नागभूषण राव विरुध्द भारत सरकार आणि इतर, याचिका क्र. ४०५/२०२३) . स्वातंत्र्य सैनिक असलेल्या १०२ वर्षीय एच. नागभूषण राव ह्यांना भारत सरकारकडून स्वातंत्र्य सैनिक सन्मान गौरव धन (पेन्शन) १९८० ह्या योजनेअंतर्गत प्रतिवादी क्र. ४ - कॅनरा बँकेमार्फत पेन्शन मिळत असते. मात्र ०१/११/२०१७ रोजी श्री. राव ह्यांचे पेन्शन अचानकपणे थांबविले जाते आणि याबाबतीत चौकशी ...