Posts

Showing posts from February 22, 2021

ग्राहकाचे शेअर्स परस्पर विकले - ब्रोकरला दणका ऍड. रोहित एरंडे. ©

 ग्राहकाचे  शेअर्स परस्पर  विकले - ब्रोकरला दणका  ऍड. रोहित एरंडे. © शेअर मार्केट मध्ये शेअरच्या खरेदी विक्री करिता डिमॅट अकाऊंट  असणे गरजेचे असते. काही गुंतवणुकदार ग्राहक  हे स्वतःच डिमॅट अकाऊंटचे व्यवहार करतात, तर बहुतांशी गुंतवणूकदार हे कुठल्यातरी शेअर-ब्रोकर मार्फत हे व्यवहार करतात. कुठले शेअर्स घ्यायचे कुठले विकायचे ह्याच्या इंस्ट्रक्शन्स ह्या बहुतेक वेळा तोंडी दिल्या जातात, पण तसे करण्याचा अलाहिदा करार हा ब्रोकर कंपनी  आणि गुंतवणूकदार ह्यांच्या मध्ये झालेला असतो.  परंतु गुंतवणूकदाराला न विचारता ब्रोकरच्या कर्मचाऱ्याने पर्यायाने ब्रोकरने ,शेअर्सचे व्यवहार केले आणि त्यामध्ये जर का ग्राहकाचे नुकसान झाले तर ब्रोकर कंपनी  आणि संबंधित कर्मचारी  नुकसान भरपाई देण्यास बांधील राहतील  का, ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देताना  राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकताच,  वामन उपासकर, गोवा  विरुद्ध इंडिया इन्फोलाईन आणि इतर (रिव्हिजन पिटिशन क्र. २८७३/२०१४ ) ह्या केसच्या निमित्ताने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ह्या केसची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेण्यापूर्वी हे आवर्जून नमूद करावेसे वाटते कि