स्त्रियांच्या मिळकतीचे वारस कोण ? - ऍड. रोहित एरंडे. ©
स्त्रियांच्या मिळकतीचे वारस कोण ? माझी आत्या नुकतीच मरण पावली. तिचे यजमान पूर्वीच मयत झाले आहेत. आत्याला मूलबाळ नव्हते. तिने नोकरी करून जी काही मिळकत कमावली त्या मिळकतींवर आता कोणाचा अधिकार असेल ? आत्याचे सासरचे देखील आता मिळकतीवर हक्क सांगायला लागले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक पुणे. या संदर्भातील कायदेशीर बाबी आधी थोडक्यात समजावून घेऊ. सर्व प्रथम हे लक्षात घ्यावे कि एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन ) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते आणि त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये त्या व्यक्तीच्या जोडीदाराला किं...