ट्रान्सफर-फी, ना वापर शुल्क आकारण्याचा अपार्टमेंट असोसिएशनला अधिकार नाही : ऍड. रोहित एरंडे ©
ट्रान्सफर-फी, ना वापर शुल्काची तरतूद अपार्टमेंट कायद्यात नाही. ऍड. रोहित एरंडे © सर, आमची अपार्टमेंट असोसिएशन आहे. आमच्याकडे अपार्टमेंट विकताना अपार्टमेन्ट असोशिएशन कडे परवानगी मागायला गेल्यास ते आमच्याकडे ट्रान्फर फी म्हणून विक्री किंमतीच्या १ टक्के इतकी रक्कम मागतात, त्याशिवाय परवानगी देणार नाही असे म्हणतात. त्याचप्रमाणे आमच्याकडे कोणी अपार्टमेंट भाड्याने दिल्यास मालकाकडून दरमहा मेंटेनन्सच्या २५% रक्कम ना वापर शुल्क म्हणून घेतात आणि दोन्ही गोष्टी करायला आमच्याकडे ठराव आहे असे म्हणतात. तर असे पैसे अपार्टमेंट असोसिएशनला घेता येतात का ? एक वाचक, पुणे. अपार्टमेंट आणि सोसायटी ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून दोघांना लागणारे कायदेही पूर्णपणे वेगळे आहेत. आपला प्रश्न हा वास्तवाकडे बोट दाखवणारा असून किती चुकीच्या पध्दतीने व्यवहार केले जातात हे आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येते. ट्रान्सफर-फी, ना वापर शुल्क (नॉन -ऑक्युपन्सी चार्जेस) ह्या तरतुदी फक्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना ज्या महाराष्ट्र सहकार कायदा आणि त्याखा...