घरात गळती, जबाबदारी कोणाची ? - ॲड. रोहित एरंडे ©
सर, जर वरच्या मजल्यावरील फ्लॅट मधून खालच्या फ्लॅटमध्ये गळती होत असेल तर लिकेज दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या सभासदाची आहे ? का सोसायटीची ? एक वाचक, पिंपरी चिंचवड. उत्तर - आपण विचारलेला प्रश्न हा कमी अधिक फरकाने अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतो. पाणी गळती कुठे होत आहे त्यावर सोसायटी जबाबदार का सभासद जबाबदार हे ठरते. सोसायटीची जबाबदारी : सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ प्रमाणे सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो याचा खर्च तसेच पावसामुळे गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, हे दुरुस्त काणे आणि त्याचा खर्च करण्याची जबाबदारी सोसायटीवर आहे. या संदर्भात २००६ साली मा. मुंबई उच्च न्यायालयाने 'हंबल को.ऑप. सोसायटी विरुद्ध शाम आणि लता बलानी' ह्या केसमध्ये दिलेला निकाल महत्वाचा आहे. लता बलानी ह्यांच्या फ्लॅटमध्ये टॉप टेरेस मधून होत असले...