सोसायटीमध्ये ना-वापर शुल्क (Non-Occupancy Charges) किती घेता येते ? ऍड. रोहित एरंडे. ©
सोसायटीमध्ये ना-वापर शुल्क (Non-Occupancy Charges) किती घेता येते ? ऍड. रोहित एरंडे. © एका गोष्टीबद्दल दुमत नसावे की सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वाद हे बहुतांशी वेळा हे आर्थिक कारणांशीच निगडित असतात आणि यामध्ये मेंटेनन्स, ट्रान्स्फर फी, आणि ना-वापर शुल्क ह्या संबंधातील वाद ह्यांचा पहिल्या तीन क्रमांकामध्ये समावेश होतो. ह्या बद्दलची माहिती कितीही वेळा सांगितली आणि कायदा होऊन अनेक वर्षे लोटली तरी लोकांच्या मनात संभ्रम दिसून येतो. एखादा सभासद स्वतः जागा वापरात नसेल आणि तिऱ्हाईत व्यक्तीस जागा भाड्याने दिली असेल, तर त्यास ना-वापर शुल्क म्हणजेच Non Occupancy Charges द्यावे लागते. अर्थात एखाद्या सभासदाने जागा न वापरता कुलूप लावून बंद ठेवली असेल, तर त्याकडून ना-वापर शुल्क घेता येत नाही, पण मेंटेनन्स घेता येतो. मात्र पुढे पुढे ना-वापर शुल्क देखील मनमानी पद्धतीने आकारले जाऊ लागले म्हणून ह्या बाबतीत देखील महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये ०१/०८/२००१ अध्यादेश काढून ना-वापर शुल्क हे देखभाल खर्चाच्या ...