Posts

Showing posts from May 3, 2022

एफ. डी' करताय, मग हे लक्षात ठेवा.. ऍड. रोहित एरंडे ©

 एफ. डी' करताय, मग हे लक्षात ठेवा..   ऍड. रोहित एरंडे © कायद्याचा अभ्यास करताना काही न्यायनिर्णय अवचित मिळून जातात. अश्याच एका निर्णयाची थोडक्यात माहिती आपण घेऊ.   व्याज कमी झाले असले तरी गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून आजही लोक मुदत ठेवींचा म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटचा (एफडी) पर्याय निवडतात. परंतु ह्या एफ.डी बद्दलची नियमावली माहिती असणे का गरजेचे आहे, हे आपल्याला ह्या निकालामुळे दिसून येईल. खात्यातील शिल्लक रक्कम मुदत ठेवीत गुंतवावी, असे केवळ एका पत्राद्वारे खातेदाराने बँकेस कळवूनही बँकेने त्याप्रमाणे कृती न केल्यास बँकेविरुद्ध नुकसानभरपाई मागता येईल काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी देताना, मुंबई उच्च न्यायालयाने  व्हेरिटास एक्स्पोर्टस विरुद्ध बँक ऑफ बडोदा (दावा क्र. १९४२/२००७) या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे बँकेत एफडी करण्यापूर्वी या प्रकरणाची माहिती घेणे उचित ठरेल. संबंधित प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी सरकारमान्य निर्यातदार असलेल्या वादी कंपनीचे प्रतिवादी बँकेत चालू खाते होते. वादी कंपनीच्या व्यवहारामध्ये अनियमितता आढळल्यामुळे सीमाशुल्क आयुक्तांच्या एका आदे