नोटाबंदी निकालाच्या निमित्ताने : बहुमतापेक्षाही अल्पमतातील निकालांचीच जास्त चर्चा.... ऍड. रोहित एरंडे ©
नोटाबंदी निकालाच्या निमित्ताने : बहुमतापेक्षाही अल्पमतातील निकालांचीच जास्त चर्चा.... ऍड. रोहित एरंडे © डॉक्टर, वकील आणि ज्योतिषी ह्यांच्यामध्ये साम्य काय असे विचारले तर ह्या तिघांकडे जाणाऱ्या लोकांना 'आवडेल असा' सल्ला मिळणे अपेक्षित असते. ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर हल्ली अशी आवड-निवड मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांबाबत म्हणता येईल. म्हणजे आपल्याला अपेक्षित निकाल आला तर कोर्ट निष्पक्ष अन्यथा दबावाखाली कम करत असणार असे मत ठोकून द्यायचे किंवा बहुतमताने निकाल, जो कायदा असतो, तो काहीही असला तरी अल्पमतातील (डिसेंटिंग जजमेंट) न्यायाधीशच कसे बरोबर आणि मग त्यांच्याबद्दल रकाने भरवायचे असे काहीसे प्रकार दिसून येतील. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि न्यायमूर्तींना तर ते अधिकच आहे आणि त्याप्रमाणे ते निकाल देतात आणि अल्पमतातील निकाल हे आपल्या निर्भिड आणि निष्पक्ष न्यायव्यवस्थेचे द्योतक आहे असे म्हणता येईल. परंतु अल्पमतातातील निकाल हा काही कायदा नसतो, असे असून देखील सोशल मिडीयावर अश्या अल्पमतातील निकालांना ज्या पद्धतीने मांडले जाते किंवा 'प्र...