कारवाई थंड, त्यामुळे बेकायदा प्लेक्स झाले उदंड : ऍड. रोहित एरंडे ©
कारवाई थंड, त्यामुळे बेकायदा प्लेक्स झाले उदंड ऍड. रोहित एरंडे © कोरोनानंतर जन -जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे आणि जागो जागी दिसणारे फ्लेक्सबाजी देखील. काही वर्षांपूर्वी पुण्यात जुना बाजार चौकात भर दुपारी अनधिकृत होर्डिंग कोसळून २ जणांनी आपले प्राण गमावले आणि ७ जण जखमी झाले. पण बेकायदा वाहतूक असो, बेकायदा बांधकामे असोत का बेकायदा प्लेक्स असोत, आपल्याकडे एखाद-दुसरा बळी गेल्याशिवाय प्रशासन देवतेला जागच येत नाही की काय असा प्रश्न पडतो. गेले दिड वर्ष कोरोनोच्या निमित्ताने का होईना, फ्लेक्सबाजी बंद पडली होती, पण आता येऊ घातलेल्या निवडणुकीच्या किंवा माननीयांचे वाढदिवस, रक्तदानापासून ते गाण्याच्या कार्यक्रमापर्यंत कुठलेतरी 'भव्य' कार्यक्रम आणि त्यासाठीच्या शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या फ्लेक्सने आपले डोळे दिपून गेले असतील. बारा महिने अठरा काळ, अभिनंदन ते सांत्वनपर अश्या वेगवेगळ्या कारणांनी शहरभर लावलेल्या बेकायदा प्लेक्स मुळे शहराचे सौंदर्य हरवून बसते आणि शहर विद्रु...