फ्लॅटमधील फेरबदल कुठले कायदेशीर कुठले बेकायदेशीर. ॲड. रोहित एरंडे. ©
आमच्या सोसायटीमधील एका सभासदाने त्याच्या ३ बीएचके फ्लॅटचे नूतनीकरण सुरु केले आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य असे म्हणून घरातील एक बाथरूम आणि टॉयलेट मोकळे करून तिथे एक खोली बनविली असून दुसऱ्या बेडरूमच्या काही भागात नव्याने टॉयलेट आणि बाथरूम केले आहे आणि अश्या नवीन बाथरूम साठी मुळातच ड्रेनेज लाईन नसल्याने नवीन ड्रेनेज लाईन बनवून ती मुख्य ड्रेनेज लाईनला जोडणार आहे. ह्या कामासाठी त्याने सोसायटीची परवानगी घेतलेली नाही तर एखाद्या सभासदाने असे करणे हे कायद्याला धरून आहे का? सोसायटी पदाधिकारी, पुणे उत्तर : जागेची दुरुस्ती करणे आणि जागेत फेरबदल करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण नमूद केलेले बदल हे दुरुस्ती मध्ये मोडणारे नसून फेरबदल किंवा जादा बांधकाम ह्या सदरात मोडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे असे कुठलेही फेरबदल हे मंजूर बांधकाम नकाशाच्या विपरीत आणि इमारतीला धोका पोहोचतील असे आणि सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण करणारे अश्या स्वर...