" आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये मुलांना आई-वडिलांच्या मर्जीवरच राहता येते"
" आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये मुलांना आई-वडिलांच्या मर्जीवरच राहता येते" Adv. रोहित एरंडे.© " आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये मुलांना आई-वडिलांच्या मर्जीवरच राहता येते" ह्या आशयाची बातमी काही दिवसांपूर्वी विविध वृत्तपत्रे आणि विशेष करून सोशल मीडिया, व्हाट्सअप वर (अतिरंजितपणे) व्हायरल झाली होती आणि बऱ्याच लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निकालावर आधारित ही बातमी होती. ह्या निकालाकडे वळण्याच्या आधी हे मात्र सांगावेसे वाटते कि ज्या घरांमध्ये आई-वडील आणि मुले ह्यांचे संबंध पराकोटीचे बिघडलेले असतील अश्याच केस मध्ये ह्या निकालाचे महत्व आहे . कारण आपल्यापैकी बहुतांशी लोकांनी नकळत्या वयात काहीतरी कारणांवरून "घरातून हाकलून देऊ का ?" ह्या स्वरूपाचे दरडावणे पालकांकडून ऐकले असेल. पण ते तेवढ्या पुरतेच.. पण ज्या घरात ह्या दरडावणीची खरोखरच अंमलबजावणी करण्याची वेळ येते, त्या घरातल्या बिघडलेल्या वातावरणाबद्दल अधिकबोलणे न लगे ....