Posts

Showing posts from April 14, 2023

सोसायटी कमिटी किती पैसे खर्च करू शकते ? रेफ्युज फ्लॅटचे काय करायचे ?ऍड. रोहित एरंडे

 सोसायटी कमिटीवर पैसे खर्च करण्यावर मर्यादा आहेत का ? प्रश्न :  आम्ही आमच्या सोसोयटीचा महिने-महा  मेन्टेनन्स करत आहे. पण एखादा मोठा खर्च करण्याची वेळ आली तर तो खर्च सोसायटीला करता येतो का ? उदा. रंगकाम करणे , ड्रेनेज लाईन  बदलणे, सोलर टाकी दुरस्ती करणे,  नविन वॉटर पंप खरेदी करणे,  वॉटर प्रुफींग असे मोठे खर्च जे लाखो रुपयांच्या घरात जाऊ शकतात ते अधिकार कमिटीला आहेत का ?  एक कमिटी मेंबर , पुणे   उत्तर : असे प्रश्न कायमच सोसायटीमध्ये उपस्थित होतात. आदर्श  उपविधी  क्र. १५७ अन्वये मॅनेजिंग कमिटीला रिपेअर्स आणि मेंटेनन्स (Repairs  and  maintenance ) पोटी वार्षिक एकदा ह्याप्रमाणे खालील  मर्यादेमध्ये, जनरल बॉडीची मान्यता न घेता,  खर्च करता येतात.  १-२५ सभासद असतील तर रु. २५,०००/- २६ ते ५० सभासद असतील तर रु. ५०,०००/- आणि ५१ आणि त्यापेक्षा अधिक सभासद असतील तर रु. १,००,०००/- ह्यापेक्षा जात रकमेचे कुठलेही खर्च असतील तर त्याला जनरल बॉडीची (general  body  meeting ) पूर्व मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच मॅनेजिंग कमिटी कुठले आणि किती मर्यादेपर्यंतचे खर्च टेंडर न काढताही करू शकेल आणि कुठ्ल्या कामासाठी टे