नॉमिनेशन : समज कमी, गैरसमज जास्त : ऍड. रोहित एरंडे ©
नॉमिनेशन : समज कमी, गैरसमज जास्त : ऍड. रोहित एरंडे © " व्हॉटसअप युनिव्हर्सिटी " वर सध्या, "मयत सभासदानी नेमलेला नॉमिनीच मालक होणार. सरकारने निर्णय घेतला आहे कि कन्व्हेयन्स डिड न करताच मालकी हक्क सहज मिळणार" असे वेगवेगळे विषय एकत्र केलेला पण एकच मेसेज फिरत आहे. त्यावर लोकांचा देखील चटकन विश्वास बसतो आणि अश्या चुकीच्या समजांना दुर करणे गरजेचे आहे. नॉमिनेशनने "मालकी हक्क" मिळत नाही हा कायदा खरेतर आता इतका पक्का झाला असताना देखील अजूनही ह्याच प्रश्नावर कोर्ट केसेस उच्च न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत, हे दुर्दैवी आहे नॉमिनेशनचा प्रश्न बहुतकरून बँक आणि सोसायटीमध्ये उपस्थित होतो. ह्या पूर्वी अनेक वेळा मा. मुंबई उच्च न्यायालायने, घाटणेकर विरुद्ध घाटणेकर ह्या १९८२ सालच्या आद्य निकालापासून तसेच मा. सर्वोच्च न्यायालायने विविध निकालांद्वारे हे स्पष्ट केले आहे की नॉमिनेशन हा वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही. त्यामुळेच जरी नॉमिनेशन केले असले तरी मालकी हक्क हा मृत्युपत्र किंवा वारसा हक्क कायद...