'कचरा जाळणे' अवैध आणि अपायकारकही - ऍड. रोहित एरंडे ©
'कचरा जाळणे' अवैध आणि अपायकारकही ऍड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीच्या मागील सोसायटीमध्ये झाडांचा पालापाचोळा बऱ्यापैकी जमा होतो आणि तेथील व्यक्ती तो पालापाचोळा जाळतात, त्याच्या धुराचा त्रास आम्हा रहिवाश्यांना खूप होतो. आम्ही त्यांना विनंती करून देखील ते हा प्रकार थांबत नाहीत. तर याबद्दल कोणती कायदेशीर कारवाई करता येईल ? त्रस्त सभासद, पुणे कचरा किंवा पालापाचोळा जाळणे हे इतके नित्याचे आपण पाहत आलो आहोत कि जणू ते करणे यात काहीच गैर नाही. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. आपल्या प्रश्नामुळे पर्यावरण आणि प्रदूषण या खूप गहन पण दुर्लक्षित महत्वाच्या विषयाला वाचा फुटेल याबद्दल आपलयाला धन्यवाद. कचरा जाळणे हे बेकायदेशीर तर आहेच पण त्याचबरोबर ते आरोग्याला देखील धोकादायक आहे. कारण अश्या धुरामुळे वायुप्रदूषण तर होतेच आणि त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आपला प्रश्न हा "पर्यावरण" या महत्वाच्या विषयाशी आणि कायद्याशी निगडित आहे. सध्या मानव निर्मित वायु, जल, जमीन, ध्वनी अश्या प्रदूषणाच्या राक्षसाने ह्या पंचमहाभूता...