कायद्याची चौकट समजून सण -समारंभ साजरे करणे हिताचे . ऍड. रोहित एरंडे ©
कायद्याची चौकट समजून सण -समारंभ साजरे करणे हिताचे . ऍड. रोहित एरंडे © सध्याच्या सण समारंभांच्या पार्श्वभूमीवर "कायद्याचे अज्ञान का कधीही बचाव कोर्टात होत नाही" हे कायद्याचे मुख्य तत्व नमूद करावेसे वाटते. हे गणेशोत्सव, दहीहंडी कार्यकर्त्यांच्या बैठका, ढोल-ताशांचा सराव देखील सुरु झाले आहेत . परंतु हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत नाहीना ह्याचे भान राखणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या त्रासांविरुद्ध दाखल झालेल्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालायने, दिलेले निकाल खूपच स्पष्ट आहेत. इतकेच काय तर 'कायद्यात बदल करून शांतता क्षेत्राची शांतता हिरावून घेण्याचा सरकारलाही अधिकार नाही' असे मा. उच्च न्यायालयाने मागील वर्षी ध्वनी प्रदूषणाबद्दलच्या नियमावलीत बदल केल्यामुळे सरकारला स्प्ष्ट शब्दात सुनावले होते. ह्या सर्व न...