वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी दिलेल्या जागेत काहीही हक्क नसतो. ऍड. रोहित एरंडे ©
वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी दिलेल्या जागेत काहीही हक्क नसतो आमच्या सोसायटीमध्ये वॉचमनला राहण्यासाठी , केवळ शब्दावर एक पैसाही न घेता पार्किंग एरिया मधील एक खोली आणि संडास बाथरूम वापरायला दिले होते. आता सोसायटीला काही कारणास्तव दुसरा वॉचमन नेमायचा आहे, परंतु पहिला वॉचमन खोली खाली करण्यास नकार देत आहे आणि 'मी आता सोसायटीचा भाडेकरू झालो आहे, तुम्ही मला काढूच शकत नाही' अशी धमकी देतोय, तर सोसायटी खोलीचा ताबा घेवू शकते का किंवा कसे, ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. सोसायटी पदाधिकारी, पुणे . आपल्या जागेचा सांभाळ करण्यासाठी केअर -टेकर , वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी आणि तेही मोफत जागा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेणेकरून त्यांना डोक्यावर छप्पर मिळते आणि जागा मालकांची सोय होते. परंतु अश्या केलेल्या उपकाराची फेड जेव्हा अपकाराने केली जाते, तेव्हा नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागते ह्याचे हि केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे. "कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" असे ...