Posts

Showing posts from March 22, 2020

इन्शुरन्स आणि प्रिमियम : काही लक्षात ठेवण्याजोगे : ऍड. रोहित एरंडे©

 इन्शुरन्स आणि प्रिमियम : काही लक्षात ठेवण्याजोगे ऍड. रोहित एरंडे© हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात इन्शुरन्सचे मह्त्व आपण  सगळेच जाणतो.  आपल्या व्यस्त जीवनचर्येमुळे पॉलिसी घेण्यासाठी, प्रिमियम भरण्यासाठी बऱ्याचवेळा  इन्शुरन्स एजंटांची मदत घेतली जाते.  पॉलीसीचा क्लेम रद्द होण्याची अनेक कारणे असतात,  परंतु काही कारणाने एजंटकडून इन्शुरन्स प्रिमियम विहित मुदतीमध्ये  भरला गेला नाही किंवा एजंट चा सल्ला चुकला आणि इन्शुरन्स पॉलीसी रद्द झाली , तर दोष कोणाचा ? हे लिहिण्याचे कारण म्हणजे अजुनही असे प्रकार काही प्रमाणात घडत असतात आणि ह्या संबंधीचा कायदा पाहिल्यास इन्शुरन्स ग्राहक म्हणून आपणच काळजी घेतली पाहिजे हे पुढील निर्णयावरून आपल्या लक्षात येईल. ह्या बाबतीतला सगळ्यात गाजलेला आणि महत्वाचा मा. सुप्रीम कोर्टा चा  , हर्षद शहा वि. एल आय सी - (एआयआर १९९७ एससी २४५९) या याचिकेवर   दिलेला निर्णय.  ह्या केस मध्ये इन्शुरन्स ग्राहकाने त्याच्या एजंटला प्रिमियमचे पैसे वेळेत दिलेले असतात, द्द होते. दुर्दैव असे की त्याच दरम्यान  इन्शुरन्स ग्राहकाचा अपघाती मृत्यू होतो, पण  पॉलिसीच  रद्द झाल्यामुळे वारसांना