हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त : ऍड. रोहित एरंडे. ©
हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त : ऍड. रोहित एरंडे. © मागील लेखात आपण बक्षीस पत्राबद्दल माहिती घेतली. ह्या लेखाद्वारे आपण मालमत्तेमधील हक्क तबदील करण्याच्या दस्तांमधील "हक्कसोड पत्र" किंवा ज्याला इंग्रजीमध्ये "रिलीज डीड" म्हणतात या एका महत्वपूर्ण दस्ताची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ह्या दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो. हक्कसोड पत्र आणि स्टँम्प ड्युटी : हक्कसोड पत्र नोंदणीकृत असणे कायद्याने आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमधील आपला हिस्सा स्वतःच्या भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा मुलगा/मुलगी ह्यांच्या लाभात किंवा जेव्हा मुलगा/मुलगी मयत असतील तर त्यांच्या मुला मुलींच्या म्हणजेच नातवंडांच्या लाभात किंवा स्वतःच्या आई किंवा वडिलांच्या किंव...