वृक्ष तोडणी कायदेशीर पद्धतीनेच आणि फेडरल सोसायटी आणि रस्त्यांची अंतर्गत मालकी
प्रश्न १ : मी डोंबिवली येथे एका सोसायटीमध्ये नुकताच फ्लॅट खरेदी केलेला आहे. या फ्लॅटसोबत एक स्टिल्ट पार्किंगदेखील मला मिळालेले आहे. सदर स्टिल्ट पार्किंग बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आहे आणि तिथे कार पार्क करण्यासाठी नेण्याच्या रस्त्यात दोन झाडांचा अडसर येतो आहे. मी ही बाब सोसायटीच्या लक्षात आणून दिली, तरीही त्यांनी ती दोन झाडे महापालिकेकडे परवानगी काढून तोडण्यास बाकी सदस्य नकार देत आहेत. जुन्या मालकाकडे कार नसल्यामुळे त्याने सदर स्टिल्ट अलोटेड पार्किंग कार पार्कसाठी वापरले नव्हते. त्यामुळे त्याला कधीही कार तिथपर्यंत नेण्याचा प्रश्न आला नव्हता. आता मात्र मला ते माझे पार्किंग माझी कार पार्क करण्यासाठी वापरावे लागणार आहे. पण तिथपर्यंत कार जायला दोन झाडांचा मोठा अडसर ठरत आहे. मला अशा परिस्थितीत काय करता येऊ शकते?. कृपया मार्गदर्शन करा. - ललित भोळे उत्तर :वृक्ष तोडणी हा विषय "महाराष्ट्र शहरी विभाग वृक्ष संवर्धन कायदा १९७५" अंतर्गत येतो . ह्या कायद्यान्वये विनापरवाना झाडे तोडण्यास मनाई करण्यात आली आहे आणि असे वर्तन शिक्षेस पात्र ठरते. ह्या कायद्याखाली ट्री ऑ...