नॉमिनीला मालकी हक्क नाही. -सर्वोच्च न्यायालय
नॉमिनीला मालकी हक्क नाही. - सर्वोच्च न्यायालय घर, जागा, शेअर्स, फंड, बँका या सर्वांमध्ये सामाईक प्रॉब्लेम कोणता येत असेल तर तो आहे, नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते, का इतर कायदेशीर वारसांना देखील अश्या मिळकतींमध्ये हक्क असतो ? घर -जागा आणि कंपन्या, बॅंका यांना नॉमिनी बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू होतो का ? या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे देताना सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम करताना परत एकदा "कंपनी कायदा हा काही वारस ठरविण्याचा कायदा नसल्यामुळे त्याखालील नॉमिनेशन पध्दत वारसा कायद्यापेक्षा वरचढ नाही आणि नॉमिनी हा मालक होऊ शकत नाही" असा निकाल न्या. हृषीकेश रॉय आणि न्या. पंकज मिथल यांच्या २ सदस्यीय खंडपीठाने, शक्ती येझदानी विरुद्ध जयानंद साळगावकर (सिव्हिल अपील क्र. २१०७/२०१७) नुकताच दिला आहे. या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघूयात. साळगावकर कुटुंब प्रमुख असलेले श्री. जयंत साळगावकर यांनी त्यांचे मृत्युपत्रकरून ठेवले होते. मात्र मृत...