अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही.- ऍड. रोहित एरंडे. ©
अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ऍड. रोहित एरंडे. © आमची १२ सभासदांची अपार्टमेंट असोशिएशन आहे. गेले काही दिवस काही सभासद आपण सोसायटी करू या अशी मागणी करू लागले आहेत कारण आजूबाजूच्या १-२ अपार्टमेंटने सोसायटी करून घेतली आहे, कारण तसे न केल्यास म्हणे मालकी हक्क जाईल. तर काही सभासदांचा याला विरोध आहे. कायदेतज्ञांचे मत विचारले तर त्यातही मतभिन्नता दिसून आली. तर अपार्टमेंटची सोसायटी करता येते का ?, असा मालकी हक्क जातो का ? त्यासाठी किती बहुमत लागते कि पूर्णमत ? अपार्टमेंट अपार्टमेंट, सांगली. सर्वप्रथम एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते , हा महत्वाचा फरक कायम लक्षात घ्यावा कारण आपली केस दुसऱ्या प्रकारात मोडते. उदा. वय वर्षे १८ आणि २१ पूर्ण झाल्यावर अनुक्रमे मुली आणि मुले कायदेशीरपणे लग्न करू शकतात, पण ह्याचा अर्थ त्या वयाचे झाल्यावर लग्न करायलाच पाहिज...