फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथेच प्रोबेट अनिवार्य : ऍड . रोहित एरंडे ©
फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथेच प्रोबेट अनिवार्य. आमच्या वडिलांनी त्यांच्या सर्व मिळकतीसाठी पुण्यामध्ये रजिस्टर्ड मृत्यूपत्र करून ठेवले होते. त्यांच्या मृत्युपश्चात आम्ही जेव्हा बँकेतल्या एफ.डी. मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा आम्हाला बँकेने त्यांच्या नियमांप्रमाणे प्रोबेट आणण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे सोसायटीसुध्दा प्रोबेट आणल्याशिवाय आमच्या नावे शेअर सर्टिफिकेट देणार नाही असे सांगत आहे. सर्व प्रॉपर्टी पुण्यातील आहे. पुण्यात प्रोबेट लागत नाही असे ऐकले होते, तरी कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, पुणे. सर्वप्रथम सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा . प्रोबेट बद्दल खूप गैरसमज दिसून येतात आणि विनाकारण प्रोबेट सक्ती मुळे ग्राहकांना नाहक आर्थिक आणि मानसिक त्रास होतो. सर्व प्रथम प्रोबेट कायद्याची थोडक्यात माहिती घेऊ. प्रोबेट सर्टिफिकेट कोर्टाने देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे होय आणि असे सक्षम कोर्टाने दिलेले प्रोबेट हे "भ...