"हे 'भूषणावह' नाही.." ऍड. रोहित एरंडे. ©
" हे 'भूषणावह' नाही.. " ऍड. रोहित एरंडे. © "जनी वावुगे बोलता सुख नाही" एवढ्या सोप्या शब्दांत समर्थ रामदास स्वामींनी समाजात वावरताना काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे, परंतु प्रत्यक्षात हे वचन आचरणात आणणे हे सोपी गोष्ट नाही. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण ह्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी ३ सदस्यीय पूर्ण पिठाने नुकतेच दोषी ठरवले आणि शिक्षा म्हणून १ रुपया दंड ठोठावला. एकंदरीतच समाज माध्यमांमध्ये, विशेष करून व्हाट्सऍप युनिव्हर्सिटीवर तर उलट सुलट प्रतिक्रियांचा डोंब उसळला. हे प्रकरण नेमके काय आहे, ह्याची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ या. प्रसिद्ध वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री शांती भुषण ह्यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले ६३ वर्षीय प्रशांत भूषण हे मा. सर्वोच्च न्यालयायतील एक ज्येष्ठ वकील आहेत. वाद-विवाद आणि प्रशांत भूषण हे जणू समीकरणच बनून गेलेले आहे. ह्या पूर्वी देखील प्रशांत भूषण आणि तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल ह्यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश भ्रष्ट आहेत असे आरोप केले होते, परंतु त्या ...