विवाहबाह्य समलैंगिक संबंध गुन्हा नाही : मा. मुंबई उच्च न्यायालय. :- ऍड. रोहित एरंडे ©
विवाहबाह्य समलैंगिक संबंध गुन्हा नाही : मा. मुंबई उच्च न्यायालय. ऍड. रोहित एरंडे © एखाद्या विवाहित पुरुषाने दुसऱ्या पुरुषाबरोबर ठेवलेले विवाहबाह्य समलैंगिक संबंध हे गुन्हा होतो का असा प्रश्न मा. मुंबई उच्च न्यायालयापुढे नुकताच डेनियल क्रॅस्टो विरुद्ध महाराष्ट्र सरकार ह्या केसच्या निमित्ताने उपस्थित झाला. ह्या केसची थोडक्यात हकीकत बघू या. एका विवाहित महिला तिच्या नवऱ्याविरुद्ध आणि डेनियल क्रॅस्टो या याचिकाकर्त्याविरुद्ध मारहाण करणे, हुंड्यासाठी मारहाण करणे, शांतता भंग करणे आणि कलम ३७७ अन्वये अनैसर्गिक संबंध अश्या विविध कारणांसाठी फौजदारी तक्रार दाखल करते. १९९४ साली लग्न झाल्यावर सुमारे ४-५ वर्षांनी सदरील महिलेला असे लक्षात येते कि तिच्या पतीचा समलैंगिकतेकडेच कल आहे. नवऱ्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे माहेरी निघून गेलेली ती नवऱ्याने सुधारण्याचे आश्वासन दिल्यामुळे परत नवऱ्याकडे येते. मात्र पुढे तिच्या लक्षात येते की नवऱ्याचे अनेक पुरुषांबरोबर समलैंगिक संबंध...