"भाडेकरूंना "सर्वोच्च" दणका !!"
भाडेकरूंना "सर्वोच्च" दणका !! Adv. Rohit Erande © "उपलब्ध असलेल्या जागेमधून कोणती जागा स्वतः करीता जास्त सोयीस्कर आहे हे ठरविण्याचा अधिकार हा फक्त घरमालकालाच आहे, कुठली जागा सोयीची आहे किंवा नाही, हे सांगण्याचाही "अधिकार" भाडेकरूला नाही .. " वरील शब्दांमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने पिडीत घरमालकांना दिलासा दिला आहे. भूपिंदर सिंग बावा वि. आशा देवी (२०१६, (१०) एस सी सी, २०९) ह्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील प्रमाणे आपला निकाल दिला आहे. ह्या केस ची थोडक्यात हकीकत अशी.. नवी दिल्ली येथील शारदा पुरी ह्या भागातील ३ खोल्या अपेलण्ट भूपिंदर सिंग बावा ह्यांच्याकडे १९८९ पासून भाडयाने होत्या . घरमालकाच्या मुलाला सदरील जागेमध्ये स्वतः चा सॅनिटरी आणि हार्डवेअर मटेरिअल्स चा सुरु करायचा असतो आणि म्हणून त्यासाठी घरमालक भाडेकरूंवर ताब्यासाठी २०११ मध्ये दावा दाखल करते. घरमालकिणीचे असे म्हणणे असते कि दावा मिळकतीचे लोकेशनच असे आहे कि ती जागा तिच्य...