लिफ्ट वापरा अगर नाही, सभासदांना लिफ्ट दुरुस्तीचे पैसे देणे क्रमप्राप्तच. - ॲड. रोहित एरंडे ©
लिफ्ट वापरा अगर नाही, सभासदांना लिफ्ट दुरुस्तीचे पैसे देणे क्रमप्राप्तच. ॲड. रोहित एरंडे © आमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्टच्या दुरुस्तीवरून सध्या वाद चालू आहे. तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील सभासद म्हणतात कि आम्ही लिफ्ट वापरत नाही म्हणून लिफ्टच्या दुरुस्तीचे पैसे देणार नाही आणि वरच्या मजल्यावरच्या सभासदांना त्याचा बोजा टाकावा असे त्यांचे म्हणणे आहे. तरी कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे. सोसायटी सेक्रेटरी - मुंबई मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य दाखविणारे असे वाद अजूनही चालू आहेत हे वाचून आश्चर्य वाटले. काही ठिकाणी तर ज्यांनी लिफ्ट दुरुस्तीचे पैसे दिले आहेत, तेवढ्याच मजल्यावर लिफ्ट थांबेल असेही प्रकार बघितले आहेत. तसेच एखादा सभासद लिफ्ट वापरत आहे कि नाही ह्याचा मग कोण ठेवणार ? आणि अश्या प्रकारे अजून काही खर्च दुसरे सभासद देण्यास नकार द्यायला लागतील. असो. दुरुस्त आदर्श उपविधी क्र. ६५ ते ७१ मध्ये संस्थेची शुल्क आकारणी कशी करावी याची साद्यंत माहिती दिली आहे. उपविधी ६५ मध्ये सेवा-शुल्क म्हणजेच ज्याला बोली भाषेत मेंटेनन्स म्हणून संबो...