स्त्रियांना स्वतःची ओळख आहे, त्यांच्यावर कोणाची असू शकत मालकी नाही
स्त्रियांना स्वतःची ओळख आहे, त्यांच्यावर कोणाची असू शकत मालकी नाही . "केवळ लग्न झाले म्हणून स्त्रियांचे स्वतःचे अस्तित्व संपुष्टात येत नाही" ऍड. रोहित एरंडे © महिला दिन जरी ८ मार्चलाच साजरा केला जात असला तरी, प्रत्येक दिवस हा तेवढाच महत्वाचा आहे आणि महिलांना स्वतःचे अस्तित्व आहे आणि महिला "दीन" नाहीत असे उद्धृत करणाऱ्या "सर्वोच्च" निकालाची थोडक्यात माहिती आपण घेऊ. इनकम टॅक्स ऍक्ट कलम १० अन्वये एकूण उत्पन्नामध्ये कोणत्या उत्पन्नांचा अंतर्भाव होत नाही ह्याची यादी दिलेली आहे. कलम १० मधील उप-कलम २६ एएए विशेष तरतूद हि २६-०४-१९७५ पूर्वी सिक्कीम राज्यात स्थायिक झालेल्या मूळ सिक्किमी नागरिकांसाठी होती ज्यायोगे एखाद्या सिक्किमी व्यक्तीचे (इंडिव्हिज्युअल) मागील वर्षीचे उत्पन्न ठरविताना त्या व्यक्तीला सिक्कीम राज्याबाहेरून मिळालेले उत्पन्न किंवा डिव्हीडंड अथवा व्याज ह्यांचा समावेश होणार नाही. मात्र "जर का कोणत्याही सिक्किमी महिलेने १ एप्रिल २००८ नंतर सिक्क...