Posts

Showing posts from April 30, 2021

सभासदाच्या आक्षेपार्ह पोस्ट साठी व्हाट्सऍप ऍडमिनला दोषी धरता येणार नाही - मा. मुंबई उच्च न्यायालय ऍड. रोहित एरंडे ©

  सभासदाच्या आक्षेपार्ह पोस्ट साठी व्हाट्सऍप ऍडमिनला दोषी धरता येणार नाही - मा.  मुंबई उच्च न्यायालय  ऍड. रोहित एरंडे © व्हाट्सऍप हा आपल्या जीवनाचा किती अविभाज्य भाग झाला आहे कि त्याची दाखल आता न्यायालयांना घ्यावी लागत आहे. सध्याच्या युगात बातम्या, माहिती, जोक्स, व्यवसाय -धंदा ह्यांपासून ते अलीकडे कोर्टाचे समन्स पाठविण्यासाठी व्हाट्सऍपचा वापर केला जातो एवढे ते 'युजर - फ्रेंडली' आहे. अर्थात कुठलेहि तंत्रज्ञान हे चांगले कि वाईट हे त्याच्या वापरावरच ठरते आणि  व्हाट्सऍप हेही त्याला अपवाद नाही. मात्र ह्या बरेचदा ह्या  प्लॅटफॉर्मवरून चुकीची किंवा कोणाची बदनामी करणाऱ्या किंवा ज्याला 'फेक-न्यूज' म्हटले जाते, अश्या  बातम्या पाठविण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आणि काही वेळा एखाद्या व्हाट्सऍप ग्रुप वरून असा मेसेज प्रसारित झाल्यास त्या ग्रुपच्या ऍडमिनवर  /व्यवस्थापकावरच पोलिसांनी कारवाई केल्याचे प्रकार दिसून आले. परंतु कायदा काय सांगतो ? सुरुवातीला असाच प्रश्न मा. दिल्ली उच्च न्यायालयापुढे २०१६ साली आशिष भल्ला विरुद्ध सुरेश चौधरी, ह्या याचिकेच्या निमित्ताने उपस्थित झा