रिडेव्हलपमेंटचा निर्णय डोळसपणे घ्यावा - ऍड. रोहित एरंडे . ©
रिडेव्हलपमेंटचा निर्णय डोळसपणे घ्यावा. आमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये रिडेव्हलपमेंट सुरु झाले आहे म्हणून आता आमच्या २४ सभासदांच्या सोसायटी मध्येहि रिडेव्हलपमेंटचे वारे व्हायला लागले आहे. मात्र आमच्याकडे २ गट पडले आहेत. एका गटाला वाटते कि रिडेव्हलपमेंट नको आणि झाले तरी ७-८ मजल्याच्या वर बिल्डिंग होऊ नये, भले वाढीव एरिया कमी मिळाला तरी चालेल कारण जेवढे सभासद वाढतील तेवढे त्यांचे प्रश्न वेगळे असतात. तर दुसऱ्या गटाला वाटते कि १२ -१५ मजली बिल्डिंग झाली तरी चालेल कारण अश्यावेळी बिल्डरचा फायदा वाढणार आणि पर्यायाने जास्त फायदा सभासदांचा पण होणार. तर ह्यासाठी बहुमत कसे असेल किंवा काय मार्ग काढावा ? काही सभासद, पुणे. पुण्यासारख्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे वारे जोरात व्हायला लागले आहेत ह्यात काही शंका नाही. एक गोष्ट सुरुवातीला नमूद कराविशी वाटते कि कायद्याने एखादी गोष्ट करावीच लागते आणि एखादी गोष्ट करता येते ह्या फरक आहे. उदा. लग्नाचे वय झाल्यावरच ...