Posts

Showing posts from April 24, 2019

"आता गोपनीय काही राहिले नाही.. " ऍड. रोहित एरंडे ©

"आता  गोपनीय  काही  राहिले नाही.. " ऍड. रोहित एरंडे  भारत सरकारच्या सरंक्षण विभागामधून राफेल संबंधी  काही कागदपत्रे चोरून त्यातील मजकूर "द हिंदू"  आणि "द वायर" ह्या इंग्रजी मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आणि ह्या बातम्यांवर अवलंबून राहून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण, अरुण शौरी आणि इतर ह्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात  राफेल निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. अश्या प्रकारे गोपनीय आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे चोरणे आणि त्यातील मजकूर प्रसिध्द करणे हा गंभीर गुन्हा आहे आणि अश्या बेकायदेशीर  प्रकारे हस्तगत केलेल्या कागदपत्रांवर आधारित याचिका मुळातच बेकायदेशीर असल्यामुळे त्या सुरुवातीलाच रद्द होण्यास पात्र आहेत असे प्राथमिक प्रतिप्रदान केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात मांडले गेले. मा. सरन्यायाधीश गोगोई, मा. न्या. संजय किशन कौल ह्यांनी संयुक्तरित्या आणि मा. न्या. के.एम. जोसेफ ह्यांनी  स्वतंत्रपणे  दिलेल्या १० एप्रिल रोजीच्या सुमारे ५६ पानी  निकाल पत्राद्वारे केंद्र सरकारचे प्राथमिक मुद्दे फेटाळून लावले आणि सद