Posts

Showing posts from October 6, 2018

बेकायदा प्लेक्स आणि अंमलबजावणीची वाट पाहणारे उदंड कायदे..

बेकायदा प्लेक्स आणि अंमलबजावणीची वाट पाहणारे उदंड कायदे.. Adv. Rohit Erande बेकायदा वाहतूक असो, बेकायदा बांधकामे असोत का आता बेकायदा प्लेक्स असोत, आपल्याकडे एखाद-दुसरा बळी  गेल्याशिवाय प्रशासन देवतेला जागच येत नाही की  काय असा प्रश्न पडतो. फ्लेक्स लावल्यावरून झालेल्या भांडणांमध्ये एका युवकाला त्याचे प्राण गमवावे लागले, तर मागील वर्षी   पुण्यात ५ ऑक्टोबरला जुना बाजार चौकात भर दुपारी अनधिकृत होर्डिंग कोसळून २ जणांनी आपले प्राण गमावले आणि ७ जण जखमी झाले. खूपच दुर्दैवी घटना आहे. ह्या लोकांच्या मृत्यूस कोण जबाबदार धरणार ? ३६५ दिवस अभिनंदन ते सांत्वनपर अश्या वेगवेगळ्या कारणांनी शहरभर लावलेल्या बेकायदा प्लेक्स मुळे  शहराचे सौंदर्य हरवून बसते. खरे तर अश्या बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्यासाठी कायद्यांची मांदियाळीच   आहे.   मुंबई प्रांतिक महापालिका कायद्याच्या कलम २४४ आणि २४५ अन्वये  खरे तर  प्लेक्स/जाहिराती/बॅनर इ. उभारण्याबेकायदा साठी आयुक्तांच्या लेखी परवानगीची गरज असते अन्यथा तो गुन्हा असून शिक्षेस पात्र आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे असे कोणतेही फलक उभारण्याआधी म