Posts

Showing posts from February 7, 2023

कट-प्रॅक्टिस वर काट - डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध - इन्कम टॅक्स विभागाचा दणका ॲड. रोहित एरंडे ©

  कट-प्रॅक्टिस वर काट - डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध  -  इन्कम टॅक्स विभागाचा  दणका ॲड. रोहित एरंडे © कायद्याच्या ऐरणीवर कोणता विषय कधी येईल याचा नेम नाही.  रेफरल फी  ज्यालाच 'सामान्य भाषेत'  कट प्रॅक्टिस असेही काही जण  म्हणतात, तो विषय   इन्कम टॅक्स विभागापुढे नुकताच आला.  'डॉक्टर आणि नर्सिंग होम्स ह्यांना 'रेफरल फी' नावाखाली दिलेली तब्ब्ल १ कोटी रुपयांची रक्कम हि पुणे येथील एका  डायग्नोस्टिक सेन्टरला  उत्पन्नातून वैध वजावट म्हणून क्लेम करता येणार नाही' असा महत्वपूर्ण निकाल नुकताच पुणे येथील इन्कम टॅक्स अपिलीय ट्रॅब्युनल ने नुकताच दिला. ह्या केसची थोडक्यात हकीकत बघू यात.   कंपनी कायद्याखाली नोंदलेल्या पुणे येथील ह्या  कंपनीचा व्यवसाय एक्स-रे, सिटी.स्कॅन अश्या वैद्यकीय निदान ( डायग्नोस्टिक) सेवा देणारा आहे. सदरील कंपनीने २०१५- १६ सालासाठी विवरणपत्र भरताना रु. १,९७,९०,४४१/-  इतक्या रुपयांचा तोटा दाखविला होता. मात्र मूल्यांकन अधिकाऱ्याने रु.९७,४४,७५१/- एवढ्या रकमेची वजावट देण्यास नकार देताना असे नमूद केले कि  हा खर्च   संबंधित कंपनीने डॉक्टर आणि नर्सिं