Posts

Showing posts from December 13, 2023

फ्लॅट विकताना सोसायटी एन.ओ.सी. ची गरज नाही. - ऍड. रोहित एरंडे ©

  फ्लॅट विकताना सोसायटी एन.ओ.सी. ची गरज नाही. आमचा फ्लॅट आम्हाला विकायचा आहे. खरेदी घेणारे  एका बँकेचे कर्ज घेणार आहेत  आणि त्या बँकेला त्यांच्या फॉर्म प्रमाणेच सोसायटीची एन.ओ.सी. हवी आहे, पण  सोसायटी त्या फॉर्म प्रमाणे एन.ओ.सी. द्यायला तयार नाही आणि यामुळे आमचा व्यवहार अडला आहे तर या बाबतीत काय करता येईल ? एक वाचक, पुणे.  बऱ्याच सोसायट्यांमध्ये  आपल्यासारखे प्रश्न निर्माण होताना दिसतात व  सोसायटी आणि बँक यांच्यापैकी दोघांनी ताणून धरले तर व्यवहारही अडकू शकतात. मात्र एन.ओ.सीची म्हणजेच सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राची खरच गरज आहे का ? याबाबतीत कोणीच विचार करताना दिसत नाही.  कारण सोसायटी आदर्श उपविधींची तरतूद बघितल्यास अश्या एन.ओ.सी.ची गरजच नसल्याचे दिसून येईल आणि गरज पडल्यास तशी एन.ओ.सी देणे सोसायटीवर बंधनकारक असल्याची तरतूद  आदर्श उपविधी ३८(ड) मध्ये दिली आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा असल्यामुळे सदरील तरतूद आहे उद्धृत करणे गरजेचे आहे.  "(ड ) संस्थेचे भांडवलात /मालमत्तेतील हस्तांतरकाचे (Transferor ) भाग व हितसंबंध हस्तांतरितीकडे (transferee ) हस्तांतरित करण्यासाठी संस्थेच्या ना हरकत प