मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही : ऍड. रोहित एरंडे ©
मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही आमच्या सासऱ्यांनी २ मृत्युपत्रे केली होती.पहिले मृत्युपत्र रजिस्टर्ड होते त्याद्वारे त्यांनी त्यांची सर्व मिळकत त्यांच्या मोठ्या मुलाला - माझे दीरांना दिली होती. नंतर मृत्युआधी काही महिने त्यांनी दुसरे मृत्युपत्र केले त्याद्वारे त्यांनी त्यांची मिळकत त्यांच्या धाकट्या मुलाला म्हणजे माझ्या मिस्टरांना दिली. पण दुसरे मृत्युपत्र रजिस्टर केले नव्हते. आता कुठले मृत्युपत्र खरे मानायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिले मृत्युपत्र रजिस्टर्ड असल्याने तेच ग्राह्य धरले जाईल असे आम्हाला सोसायटीकडून सांगण्यात आले आहे आणि दुसरे मृत्यूपत्र असूच शकत नाही असे दीर म्हणत आहेत. तरी कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक पुणे. मृत्युपत्र म्हणजेच WILL या विषयाबद्दल आपल्याकडे भिती असतेच परंतु त्यापेक्षाहि गैरसमज किती आहेत हे दिसून येते. आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने या संदर्भातील महत्वाच्या कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी ह...