पाणी गळती : सोसायटी आणि फ्लॅट धारक ह्यांची जबाबदारी काय ? - ॲड. रोहित एरंडे ©
प्रश्न : पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे आमच्या सदनिकेच्या पश्र्चिमेच्या बाजूच्या आतल्या बाजूने दोन्ही बेडरूममध्ये पाणी झिरपून भिंतीचे प्लॅस्टर प़डले आहे व रंगाचे नुकसान झाले आहे. सदर भिंतीच्या बाहेरच्या बाजूने प्लॅस्टरला मोठ्या भेगा पडल्या आहेत.आम्ही सोसायटीच्या निदर्शनास सदर बाब सन २०१३ पासून तोंडी आणून दिली होती. नंतर सन २०१८ पासून वारंवार लेखी कळविण्यात आले होते.परंतु सोसायटीने काहीही केले नाही. आता निविदा मागवून स्ट्रक्चरल ऑडिटर नेमून पूर्ण इमारतीची दुरुस्ती करून घेण्याचे संकेत सोसायटीने दिले आहेत, पण ते कधी होईल माहिती नाही. आमच्या सदनिकेत आम्हास नूतनीकरण करून घ्यावयाचे आहे. सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे बेडरूमच्या भिंतीच्या आतील बाजूस नुकसान झालेल्या प्लॅस्टरची व रंगाची नुकसानभरपाई आम्ही सोसायटीकडून मागू शकतो का ?. एक सदनिकाधारक उत्तर : पाणी गळती आणि भरपाई हा ज्वलंत प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये भेडसावत असतो. पाणी गळतीचा खर्च हा कोणत्या सभासदाने करायचा ? का सोसायटीने करायचा, हे नेहमीचे वादाचे मुद्दे समोर येतात. सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ प्रमाणे...