कोरोना काळ - एकमेकांच्या ' माहितीची ' माहिती करून घेण्याची गरज.
कोरोना काळ - एकमेकांच्या ' माहितीची ' माहिती करून घेण्याची गरज. ॲड. रोहित एरंडे.© " मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".. ह्या कोरोना काळात जीवनाची अनिश्चितता आपल्याला उमगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीचे कोणीना कोणीतरी कोरोना ला बळी पडले आहे. ह्या अचानक धक्क्याने घराची, धंद्याची पूर्ण घडीच विस्कटून गेल्याचे दिसून येते. ह्या काळात वकील मंडळींकडे मृत्यूपत्राबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र ह्या बाबतीत काही गोष्टी कॉमन जाणवल्या त्या म्हणजे जोडीदारांना एकमेकांच्या प्रॉपर्टी बद्दल, बँक खाती, पॉलिसी, शेअर्स, ऑनलाईन बँकिंग करत असल्यास त्याचे पासवर्ड, ते कसे वापरायचे ह्याची काहीच माहिती नसते. बऱ्याच वेळा एकमेकांचे फोनचे पासवर्ड देखील माहिती नसतात. दुर्दैवाने असा अनुभव आहे की बरेचदा महिला मंडळींना ह्या बाबतीत फारच कमी माहिती असते. ह्याचा तोटा पुढे जेव्हा अघटीत घडते तेव्हा जाणवतो. ह्या सर्व गोष्टी पैश्याशी निगडित आहेत. "पैसा खुदा तो नही, लेकीन खुदासे कम भी नही" हे तितकेच खरे आहे. शेवटी सर्व ठिका...