फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©
फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे. © सोसायटीमधील फ्लॅट मध्ये बाजूच्या भिंतींमधून किंवा सर्वात वरचा फ्लॅट असेल, तर गच्चीमधून , विशेषतः पावसाच्या दिवसांमध्ये, होणारी पाणी गळती कोणी दुरुस्त करायची आणि त्याचा खर्च कोणी करायचा हा ज्वलंत प्रश्न असतो. ह्या संबंधी सोसायटी बाय लॅ।ज -उपनियम मधील तरतुदी आणि २ महत्वपूर्ण निकाल ह्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊ. सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ मध्ये सोसायटीने दुरुस्तीचे आणि देखभालीची कुठले कुठले खर्च करणे गरजेचे आहे, त्याची यादी दिलेली आहे. ह्या मध्ये सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो. तसेच पावसामुळे गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, ह्या खर्चाचा समावेश होतो, जो सोसायटीने करणे गरजेचे आहे. हे नियम असून देखील काही वेळा सोसायटीने असे खर्च करण्यास नकार दिल्यामुळ...