Posts

Showing posts from August 9, 2022

उत्सव साजरे करा, पण कायद्याची चौकट सांभाळा ! : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे. ©

उत्सव साजरे करा, पण कायद्याची चौकट सांभाळा !  : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही  बचाव  होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे.  ©  जाणते  -अजाणतेपणे कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव  होऊ शकत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी   काही  दिवसांवर येऊन  ठेपले आहेत.  गेले दोन वर्षे कोरोना मुळे कुठलेच उत्सव साजरे होवू शकले नाहीत आणि त्यातच मा. मुख्यमंत्र्यांनी देखील मुक्तपणे उत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रचंड उत्साहात कार्यकर्त्यांच्या बैठका,   ढोल-ताशांचा सराव   सुरु झाले आहेत . परंतु  ह्या उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत  नाहीना ह्याचे भान  राखणे गरजेचे आहे कारण कायद्याचे अज्ञान" हा कधीही  बचाव  होऊ शकत नाही.. अखेर कायदा सर्वश्रेष्ठ असतो.   गेल्या काही काळात  सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या  त्रासांविरुद्ध काही जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल  खूपच  स्पष्ट आहेत.   दही-हंडी बाबत देखील  काही वर्षांप