सोसायटीमधील रेफ्युज एरिया म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे Ⓒ
सोसायटीमधील रेफ्युज एरिया म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे Ⓒ बांधकाम क्षेत्रामध्ये कालानुरूप अनेक बदल झाले. सुमारे ८०-९० च्या दशकात आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल कि ४-५ माजली बिल्डिंग म्हणजे खूप मोठी बिल्डिंग वाटायची. मात्र जस जशी लोकसंख्या वाढू लागली आणि जागांची मागणी वाढू लागली तशी इमारतींची उंची देखील वाढू लागली. आणि आता तर १० पासून ५० मजल्यापर्यंत बिल्डिंग आपल्याकडे सहजरित्या बांधल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र जेवढ्या उंच बिल्डिंग तेवढे त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम्स देखील तसेच मोठे. एवढ्या मोठ्या उंच बिल्डिंगमध्ये जर दुर्दैवाने आग लागल्यासारखे आपत्कालीन प्रसंग निर्माण झाले तर सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी एखाद्या सुरक्षित ठिकाणाची गरज असते. ह्या दृष्टीने भारतामध्ये सुमारे २००५ मध्ये प्रकाशित झालेल्या नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये ' रेफ्युज एरिया' हि संकल्पना मंडळी गेल्याचे दिसून येते. ह्या बांधकामाबद्दल सर्व काही असे स्वरूप असलेल्या ह्या कोड मध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी जे मार्ग आहेत ते कायमच मोकळे आणि अतिक्रमण मुक्त ठेवले पाहिजेत...