Posts

Showing posts from March 29, 2023

अविवाहित व्यक्तींना / विद्यार्थ्यांना फ्लॅट भाडयाने देण्यापासून सोसायटी मज्जाव करू शकत नाही. ऍड. रोहित एरंडे ©

अविवाहित व्यक्तींना / विद्यार्थ्यांना फ्लॅट भाडयाने देण्यापासून सोसायटी मज्जाव करू शकत नाही. ऍड. रोहित एरंडे © सर, आमच्या सोसायटीमध्ये काही नुकताच एक ठराव पास झाला आहे आणि त्यायोगे अविवाहित व्यक्तींना / विद्यार्थ्यांना फ्लॅट भाडयाने देण्यापासून सभासदांना बंदी करण्यात आली  आहे. तसेच ज्यांनी आधीपासून विद्यार्थ्यांना फ्लॅट भाड्याने दिला आहे त्यांच्याकडून  रु. ५०००/- दंडाचे म्हणून आकारले जाणार आहेत. तर  हे  कायदेशीर आहे का ?   एक वाचक, पुणे.  उत्तर - हा प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये  वेळो वेळी निर्माण होतो आणि त्यामध्ये फ्लॅट धारक आणि सोसायटी असे दोन तट पडतात. मंजूर नकाशाप्रमाणे ज्या कारणाकरिता फ्लॅटचा वापर अपेक्षित आहे, त्या कारणाकरिता तो सभासद त्याचा फ्लॅट कोणालाही भाड्याने देऊ शकतो आणि त्यासाठी सोसायटीच्या पूर्व परवानगीची अजिबात गरज नाही. सभासदाने त्याचा फ्लॅट हा विवाहित जोडप्याला द्यायचा का विद्यार्थ्यांना द्यायचा हा सर्वस्वी अधिकार फ्लॅटधारकाचा आहे आणि हेच  नवीन आदर्श उपविधी मधील नियम क्र. ४३(बी), मध्ये नमूद केले आहे. ह्या नियमाप्रमाणे जागा  भाड्याने देण्यासाठी सोसायटीच्या पूर्व परवानगी