सोसायट्यांपुढील २ प्रश्न : कन्व्हेयन्स डीड न होणे आणि मोकळी जागा वापरण्यावरील बंधने : . ऍड. रोहित एरंडे.
प्रश्न : ५७६ सदनिका असलेल्या आमच्या सोसायटीमध्ये २००४ पासून लोकं राहिला आलीत आणि २००८ मध्ये सोसायटी रजिस्टर झाली पण आजपर्यंत कन्वेयन्स डीड करण्यात आले नाही. त्यात सोसायटीतील मोकळ्या जागेत मोठ मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच पुनर्विकासाच्या नावाखाली रस्त्यालगतची जागा ही भाडेतत्वावर बिल्डर ला कार्यालयासाठी देण्याचे चालले आहे. सदर जागा ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला आहे व सोसायटी मध्ये प्रवेश करण्यासाठी एक चारचाकी वाहन जाईल एवढाच रस्ता आहे. सदर जागेखाली ड्रेनेज लाइन, पाण्याची पाइप लाइन तसेच महानगर गॅस ची लाइन आहे. तरीसुद्धा सोसायटी पदाधिकारी व त्यांचे समर्थक यांनी सोसायटीला उत्पन्न मिळत आहे म्हणून सदर कामाला मंजूरी दिली आहे. तर ह्याबाबत कायदा काय सांगतो ? श्री. देवानंद खिलारी उत्तर : कन्व्हेयन्स डीड न होणे आणि मोकळ्या कायदेशीर जागेचा वापर हे आपल्यासारखेच दोन प्रमुख प्रश्न आणि त्याबद्दलचे गैरसमज अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतात. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, म्हणजेच सोप्या शब्दांत खरेदी खत असे म्हण...