गर्भपाताचा अधिकार : काही उत्तरे आणि काही प्रश्न. ऍड. रोहित एरंडे. ©
गर्भपाताचा अधिकार : काही उत्तरे आणि काही प्रश्न. , ऍड. रोहित एरंडे. © विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित महिलांनाही २४ आठवड्यापर्यंत गर्भधारणा असल्यास सुधारित वैद्यकीय गर्भपात कायद्याप्रमाणे (एम. टी. पी. कायदा) गर्भपाताची मुभा आहे, असा महत्वपूर्ण निकाल मा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती जे.बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने नुकताच दिला (संर्दभ : एक्स विरुद्ध दिल्ली सरकार, याचिका क्र. १२६१२/२०२२) . आपल्या ७५ पानी निकालपत्रामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ह्यांनी ह्या संदर्भातील कायदा, सामाजिक परिस्थिती अश्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे आणि त्याअनुषंगाने त्यांनी विवाहपूर्व लैंगिक संबंध, लैंगिक शिक्षण अश्या विषयांवर देखील भाष्य केलेले आहे, त्याने काही पारंपरिक संकल्पनांना धक्के पोचणार आहे आणि त्यामुळे काही उत्तरे मिळाली तरी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचा थोडक्यात परामर्श घेण्याचा आपण प्रयत्न करू. सर्वप्रथम ह्या केसची पार्श्वभूमीचा आढावा घेऊ. मूळची मणिपूरचे अ...