हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि जीवनावश्यक नसून कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि म्हणून त्यास सर्व्हिस टॅक्स लागू होतो. ऍड. रोहित एरंडे.©
हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि जीवनावश्यक नसून कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि म्हणून त्यास सर्व्हिस टॅक्स लागू होतो. ऍड. रोहित एरंडे.© पु. ल. देशपांडे म्हणतात तसे " माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असले तरी चालेल, पण माणूस ही गेलेली केस नसावी" कायद्याचा अभ्यास करताना काही 'इंटरेस्टिंग' निकाल अवचित समोर येतात आणि त्याची माहिती असणे गरजेचे ठरते अश्याच एका 'केस आणि त्यावरील कर ' केसची माहिती घेऊ. स्त्री असो वा पुरुष, सौंदर्य खुलवण्यात डोईवरील केसांचा वाटा फारच महत्वाचा. मात्र कधीकधी एकूण व्यक्तिमत्त्व आकर्षक असूनही एखाद्याचा ‘केसाने गळा कापलेला असतो’. त्यामुळे केस 'काळे" करण्यापासून "टोप (विग)" घालण्यापर्यंत अनेक प्रकार अवलंबिले जातात. ह्यातील गमतीचा भाग सोडला तर आता तंत्रज्ञान पुढे गेले आणि आता टोप (विग) घालण्यापेक्षा हेअर रिप्लेसमेंट, हेअर रिस्टोरेशन आणि सध्याची सर्वात लोकप्रिय म्हणजे केसांचे प्रत्यारोपण ज्याला इंग्रजीमध्ये हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात त्यापद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र असे हे हेअर ट्रान्सप्लांट कायद्याच्या ऐरणीवर वेगळ्याच ...