Posts

Showing posts from November 2, 2022

मिटींगला हजर राहिले नाही म्हणून दंड करण्याचा अधिकार सोसायटीला नाही.' .ऍड. रोहित एरंडे ©

'मिटींगला हजर राहिले नाही म्हणून दंड  करण्याचा अधिकार सोसायटीला नाही.'  नमस्कार. माझा एका सोसायटीमध्ये  फ्लॅट आहे, पण  मी तिथे राहत नाही. मला सोसायटीच्या मिटिंगची नोटीसही मिळत नाही.   आमच्या सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटीने  नुकतेच एक सर्क्युलर काढून असे सूचित केले आहे कि जे सभासद सोसायटी मिटींगला हजर राहणार नाहीत त्यांना रु. १,०००/- इतका दंड प्रत्येक मिटिंग मागे करण्यात येईल. असे करणे कायदेशीर आहे का ? — एक वाचक सोसायटीमध्ये  मॅनेजिंग कमिटीचा  कारभार हा एक वादाचा विषय असतो.  बऱ्याच सोसायट्यांमध्ये 'थँकलेस जॉब' समजल्या जाणाऱ्या मॅनेजिंग कमिटी मध्ये काम करण्यास कोणी तयार नसते त्यामुळे जे काम करतात त्यांचा खाक्या चालण्याची शक्यता असतेच. आपल्या केसमध्ये सर्वांनी मीटिंगला उपसस्थित राहून सोसायटीच्या मिटिंगमध्ये उपस्थित राहावे असा चांगला हेतू  मॅनेजिंग कमिटीचा आहे असे गृहीत धरले तरी त्यांनी निवडलेला मार्ग नक्कीच कायदेशीर नाही आणि सोसायटी कायद्यामध्ये किंवा उपनियमांमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही ज्यायोगे मिटिंगला हजर राहिला नाही म्हणून सभासदाला दंड करता येईल. इतकेच काय तर मिटींगला