Posts

Showing posts from February 18, 2024

गृहनिर्माण सोसायट्या : सभासदत्व आणि मतदानाचे हक्क - महत्वाचे फेरबदल. - ऍड. रोहित एरंडे ©

    गृहनिर्माण सोसायट्या  : सभासदत्व   आणि महत्वाचे फेरबदल.  ॲड. रोहित एरंडे. © महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये २०१९ साली सुधारणा होऊन या अधिनियमात नवे '१३ ब' ह्या सर्वसमावेशक प्रकरणाचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यायोगे  कलम १५४ ब (१) ते (३१) पर्यंत या सुधारणांचा समावेश झालेला आहे. मात्र या सुधारणांबाबत अजून जागृती झालेली दिसून येत नाही,  त्या अनुषंगाने सोसायट्यांच्या सभासदत्व - निवडणुका इ. बाबत  काय बदल झाले  आहेत ह्याचा थोडक्यात परामर्श घेऊ.  सहयोगी सदस्य (असोसिएट मेम्बर ): कलम  १५४ ब (अ)(१८) अन्वये   एखाद्या सदस्याच्या  लेखी शिफारशीने आणि पूर्व लेखी संमतीने त्याच्या हक्क आणि कर्तव्यांचा वापर करण्यासाठी त्या सभासदाचे -  पती, पत्नी, माता, पिता, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई, सून, पुतण्या, पुतणी यांना संस्थेचा सहयोगी सभासद करून घेता येईल. अशा सभासदाला मतदानाचा व समिती निवडणूक लढविण्याचा हक्क असेल. मात्र अश्या सहयोगी सभासदाचे नाव शेअर सर्टिफिकेट वर पहिले नसेल. असोसिएट मेम्बरला मुख्य सदस्याच्या पूर्वपरवानगीने मतदान करता येईल. या तरतुदीचा उपयोग  ज्येष्ठ सदस्यांना किं