पोटगी मिळण्यासाठी आता प्रतिज्ञापत्राची "सर्वोच्च' अट. पोटगी प्रकरणांवर अंतर्बाह्य परिणाम करणारा निकाल. : ऍड. रोहित एरंडे ©
पोटगी मिळण्यासाठी आता प्रतिज्ञापत्राची "सर्वोच्च' अट : पोटगी प्रकरणांवर अंतर्बाह्य परिणाम करणारा निकाल. ऍड. रोहित एरंडे. © घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा आणि विवादास्पद मुद्दा हा "पोटगीचा" म्हणजेच मेन्टेनन्स चा असतो. पोटगीचा अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या समांतर कायद्यांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत आणि ह्या प्रत्येक कायद्याखाली पोटगीचा अर्ज देता येतो, मग एका कायद्याखाली पोटगी मिळाली तर दुसऱ्या कायद्याखाली पण अर्ज देता येतो का ? तसेच पोटगी मागणाऱ्या पत्नीची खरच आर्थिक परिस्थिती चांगली आहे का नाही, नवऱ्याची परिस्थिती पोटगी देण्याची आहे का नाही ह्या बाबत विरुद्ध बाजूंकडून नेहमीच आरोप प्रत्यारोप केले जातात, काही वेळा बायकोच्या मागण्या ह्या अतिशोयोक्तीच्या असतात तर काही ठिकाणी नवरे स्वतःचे खरे उत्पन्न लपवतात आणि तश्यातच ह्या प्रकारच्या केसेस मध्ये विविध न्यायालयांचे परस्परविरोधी निकाल देखील आले आहेत. सबब ह्या सर्व प्रकरणाला आता मा. सर्वोच्च न्यायालायने नुकत्याच दिलेल्या एका निका...