फ्लॅटच्या '_ व्यवहारांवर स्टँम्प ड्युटी माफी नाहीच. ऍड. रोहित एरंडे.©
फ्लॅटच्या 'रिसेल' व्यवहारांवर स्टँम्प ड्युटी माफी नाहीच. ऍड. रोहित एरंडे.© काही कायदेशीर गोष्टींबाबत आपल्याकडे दृढ गैरसमज आहेत उदा. ७/१२ उताऱ्याने मालकी हक्क ठरतो, मृत्युपत्र केले म्हणजे आता मृत्यु जवळ आला, जागा नावावर करायची तर फक्त टॅक्स पावतीवर नाव बदलले कि झाले. ह्या विषयांवर कितीही वेळा लिहिले तरी कमी पडेल अशी परिस्थिती आहे. आता ह्यामध्ये अजून एका विषयाची भर गेले २-३ वर्षांपासून पडलीय, ती म्हणजे, "रिसेल चा फ्लॅट विकत घेताना स्टँम्प ड्युटी माफ आहे" !. मानवी स्वभाव हा जात्याच एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळणार असेल तर त्याला पौष्टिक मानणारा असल्यामुळे लोकांचाही अश्या अफवांवर लगेचच विश्वास बसतो आणि सोशल मिडियावरील पोस्ट्स त्याला हातभार लावतो. स्टँम्प ड्युटी माफी, हि अफवा पसरण्याचे कारण म्हणजे मा. मुंबई उच्च न्यायालायने दिलेल्या निकालाचा "मिडीयाने" लावलेला (गैर) अर्थ. काय होता हा निकाल आणि त्याची पार्श्वभूमी थोडक्यात समजावून घेऊ, एखाद्या जागेची किंवा स्टॅम्प ऍक्ट अस्तित्वात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जागांची पुनर्विक्री (रिसेल) करताना...