Posts

Showing posts from January 8, 2023

बिल्डरच्या दृष्टीकोनातून : अपार्टमेंट करावी का सोसायटी ? : ॲड. रोहित एरंडे ©

 बिल्डरच्या  दृष्टीकोनातून :  अपार्टमेंट करावी का सोसायटी ? : अपार्टमेंट आणि सोसायटी - यांच्यामधील महत्वाचे फरक काय ? ॲड. रोहित एरंडे © क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई सातारा  यांनी मला महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सोसायटी चांगली का अपार्टमेंट असे प्रश्न बरेचदा विचारले जातात आणि ह्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज दिसून येतात. काही ठिकाणी तर अपार्टमेंट असेल तर बिल्डरच मालक होणार आणि जागा हडपणार असे मेसेजेस व्हायरल होत आहेत.  प्रत्येकाचे फायदे तोटे वेगळे. ह्या लेखाच्या अनुषंगाने सोसायटी आणि अपार्टमेंट मधील ठळक फरक थोडक्यात बघू यात.   कन्व्हेयन्स म्हणजे ? आजही अनेक ठिकाणी बहुतांश सोसायट्यांचा कन्व्हेयन्स झालेला दिसून येत नाही. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत आहे, म्हणजेच  जमिनी ची मालकी एका कडे व त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू असते, तर बहुतांश पाश्चात्य देशांमध्ये ज्याच्या मालकीची जमीन तोच त्य...